Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | भव्य जाहीर सत्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोक कलाकार...

रामटेक | भव्य जाहीर सत्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोक कलाकार मेळावा…

राजु कापसे
रामटेक

रामटेक : रमाई महिला भजन मंडळाच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व भव्य भव्य जाहीर सत्कार फेटरी येते, नागपूर फेटरी येते, लोककलांचा मेळावा, रमाई महिला भजन मंडळाच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, व भव्य जाहीर सत्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोक कलाकार मेळावा, नागपूर फेटरी, भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली, मागासवर्गीय गोपाल समाज कल्याणकारी संस्था नागपूर, माहूर झरी, यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कला महोत्सव, सत्कार सोहळा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, भव्य लोककला जाहीर मेळावा, दिनांक,15/9/2024 रोज रविवारला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत, स्थळ ग्रामपंचायत कार्यालय फेटरी, समाज भवन येथे, लोक कलावंताच्या मेळावा, मोठ्या उत्साहात पार पडला,

या कार्यक्रमाचे उद्घाटक, विदर्भ शाहीर कलाकार परिषद अध्यक्ष मनीष देवगडे, तर विदर्भ शाहीर कलाकार परिषद कार्याध्यक्ष, अलंकार टेंभुर्ण, यांच्या हस्ते पार पडला, प्रमुख अतिथी, सभापती पंचायत समिती नागपूर, रूपाली मनोहर, पंचायत समिती सदस्या नागपूर, प्रीती अखंड, पंचायत समिती सदस्या नागपूर,राऊत मॅडम, जिल्हा परिषद सदस्य नागपूर,सुनील जामगडे, ग्रामपंचायत फेटरी सरपंच, रवींद्र खांबलकर, विदर्भ संघटक प्रमुख, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कड बे, अरुण वाहने, कार्यक्रमाचे आयोजक अशोक लोणारे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते, महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून,अभिवादन करण्यात आले,

याप्रसंगी, दक्षिण नागपूर, दिघोरी पवनपुत्र नगर, येथील रमाई महिला भजन मंडळाच्या, सुप्रसिद्ध गायिका, वर्षा शेंडे, यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले, त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी पत्रकार अरुण कराळे, पत्रकार चंद्रकांत भोयर,पत्रकार संजय खांडेकर, पत्रकार युवराज मेश्राम, प्रबोधनकार शाहीर प्रदीप कड बे, गायिका अर्चना मोटघरे, गायिका जोशना मेश्राम, दीक्षा चव्हाण, सपना ढेकले, स्वाती वाघमारे, वंदना महेश कर, संगीता महल्ले, माधुरी कळस्कर, कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन, अशोक लोणारे यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन, अरुण वाहने यांनी केले, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहर कलाकार उपस्थित होते

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: