Sunday, December 22, 2024
Homeशिक्षणरामटेक | किट्स ऑटोनॉमस महाविद्यालय मध्ये 39 वा स्थापना दिवस संपन्न

रामटेक | किट्स ऑटोनॉमस महाविद्यालय मध्ये 39 वा स्थापना दिवस संपन्न

रामटेक : किट्स कविकुलगुरू इंस्टिटयूटय ऑफ टेक्नॉलाजी अॅण्ड सायंस,किट्स (युजीसी अँटोनॉमस) महाविद्यालय रामटेक मध्ये 39 वा स्थापना दिवस 19 सप्टेबर ला किट्सच्या सिल्व्हर जुबली हॉल मध्ये संपन्न झाला. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत व्ही. राजेश्वरराव यांना अभिवादन करण्यात आले. स्थापना दिवसाचे उद्‌घाटन प्रमुख वक्ते श्री संदिप अग्रवाल यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाची अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली. या वेळी प्रामुख्याने आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. यशवंत जिभकाटे, डीन. डॉ. पंकज आष्टणकर, विद्युत विभाग प्रमुख भानुदास टाले सहीत विविध विभागाचे डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

प्रमुख अतीथी संदिप अग्रवाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की पढाई के अलावा पढाई सुद्धा तेवढीच महत्वाची आहे.. शैक्षणिक अभ्यासक्रम व्यतिरिक विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचा अभ्यास करावा. त्यातून नवीन संकल्पना मिळू शकते. कौशल्य हासिल करा, निर्णय घेण्याची क्षमता वाढवा, परिवार व मित्रा मधे विश्वास वाढवा, संवेदनशील व्हा, निरोगी राहा व मनापासून काम करा.

प्रस्तावना प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे यांनी केली. ते म्हणाले की किट्स रामटेकचे उद्‌घाटन पूर्व पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी केले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत व्ही. राजेश्वरराव यांच्या दुरदृष्टीने संस्था आज ऑटोनॉमस झाली आहे. संस्था सचिव व्ही श्रीनिवास व संचालक व्ही. प्रणव यांचा मार्गदर्शनात संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण सहित सर्व सोयी उपलब्ध करून देत आहे. ऑटोनॉमस मुळे उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुजाता अलोने, व धन्यवाद डॉ. पंकज आष्टणकर यांनी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: