Monday, June 24, 2024
spot_img
HomeMarathi News Todayराज्यसभेच्या अध्यक्षांची विरोधी पक्षाच्या खासदाराने उडविली खिल्ली...पाहा व्हिडिओ

राज्यसभेच्या अध्यक्षांची विरोधी पक्षाच्या खासदाराने उडविली खिल्ली…पाहा व्हिडिओ

विरोधी खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात मंगळवारी संसदेच्या संकुलात विरोधकांनी निदर्शने केली. विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर राज्यसभेच्या अध्यक्षांची नक्कल केल्याचा आरोप केला जात आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. जगदीप धनखर यांची नक्कल सुरु असताना कल्याण बॅनर्जी यांचा काँग्रेस खासदार राहुल गांधी व्हिडिओ शूट करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगदीप धनखर म्हणाले की, एक खासदार मस्करी करत होता आणि एक मोठा नेता त्याचा व्हिडिओ शूट करत होता. हा सभागृहाचा अपमान असल्याचे धनखर म्हणाले. गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: