विरोधी खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात मंगळवारी संसदेच्या संकुलात विरोधकांनी निदर्शने केली. विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर राज्यसभेच्या अध्यक्षांची नक्कल केल्याचा आरोप केला जात आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. जगदीप धनखर यांची नक्कल सुरु असताना कल्याण बॅनर्जी यांचा काँग्रेस खासदार राहुल गांधी व्हिडिओ शूट करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगदीप धनखर म्हणाले की, एक खासदार मस्करी करत होता आणि एक मोठा नेता त्याचा व्हिडिओ शूट करत होता. हा सभागृहाचा अपमान असल्याचे धनखर म्हणाले. गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023