Rajasthan CM : राजस्थान निवडणुकीच्या निकालाला सात दिवस उलटूनही BJP ने मुख्यमंत्र्याचे उघड केले नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले तिजारा विधानसभेतील भाजपचे नवनिर्वाचित आमदार बाबा बालकनाथ यांनी एक निवेदन जारी करून स्वतःला शर्यतीतून बाहेर काढले आहे. सुरुवातीला बाबा बालकनाथ यांच्या नावाची मोठी चर्चा होती मात्र आज या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.
बालकनाथ यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर करून मुख्यमंत्रीपदापासून दूर झालो आहे. बाबा बालकनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच जनतेने खासदार आणि आमदार बनवून देशसेवेची संधी दिली आहे. निवडणूक निकाल आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी बाबा बालकनाथ यांना म्हणाले होते, “नवीन मुख्यमंत्री बनत आहे…”महंत बालकनाथ यांनी हसून उत्तर दिले होते.
पार्टी व प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में जनता-जनार्धन ने पहली बार सांसद व विधायक बना कर राष्ट्रसेवा का अवसर दिया।चुनाव परिणाम आने के बाद से मीडिया व सोशल मीडिया पर चल रही चर्चाओं को नज़र अंदाज़ करें।मुझे अभी प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में अनुभव प्राप्त करना है।
— Yogi Balaknath (@MahantBalaknath) December 9, 2023