Thursday, June 20, 2024
spot_img
Homeराज्य१८-१९ डिसेंबरला ठाण्यात "खासदार करंडक" चिंतामणी कला मंच, मुंबईच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे...

१८-१९ डिसेंबरला ठाण्यात “खासदार करंडक” चिंतामणी कला मंच, मुंबईच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे ४थे वर्ष…

मुंबई – गणेश तळेकर

चिंतामणी कला मंच, मुंबई या संस्थेमार्फत वर्षभरात अनेक उपक्रम, स्पर्धा राज्यपातळीवर राबवल्या जातात.
महाराष्ट्रातील विविध विभागातील मुलांना एक रंगमंच मिळावा, प्रतिभावंत मुले घडावी या उद्देशातून या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भरवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे “महासंग्राम – खासदार करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२३-२४. या स्पर्धेच्या आयोजनाचे हे ४थे वर्ष आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे या विभागातील संस्थांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे परीक्षण मराठी चित्रपसृष्टीतील तसेच मराठी नाट्य सृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते समीर पेणकर आणि मराठी चित्रपसृष्टी, नाट्यसृष्टी तसेच छोट्या पडद्यावरील मालिकांमधून झळकणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुशील इनामदार करणार आहेत.

चिंतामणी कला मंच, मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश दीपक पिंगळे आणि स्पर्धा प्रमुख पूजा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १८ आणि १९ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: