Thursday, June 20, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीपातूर येथे वरली मटक्यावर धाड...

पातूर येथे वरली मटक्यावर धाड…

निशांत गवई,पातूर

पातुर शहरात दिनांक 4 5 2024 रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान श्री गोकुळराज सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी बाळापुर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पातुर शहरातील कॉलिटी हॉटेलच्या मागे सार्वजनिक ठिकाणी काही इसम लोकांकडून पैसे घेऊन वरली मटक्याची आकडे लिहून जुगारावर हर्जित करून पैशाची खायवाडी करीत असल्याचे माहिती मिळाली असता त्यांच्यासोबत जाऊन नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून रेड केली असता वरली मटक्याचे आकडेवारी पैशाची काय वाडी करणारे ही सम नासिर खान हाफिजुल्ला खान वय 56 वर्ष राहणार मोमीनपुरा +10 इसम यांच्या जवळून नदी रुपये 49880, घटनास्थळावरून तीन मोटरसायकल किंमत 175000रुपये वेगवेगळ्या कंपनीचे दहा मोबाईल किंमत अंदाजे 84500रुपये दोन कॉम्प्युटर व साहित्य किंमत अंदाजे 70000 तसेच वरली मटक्याचे साहित्य असा एकूण 379380 रुपये रुपयाचा माल पंचा समक्ष पंचनामाप्रमाणे जप्त करण्यात आला आहे व पोलीस स्टेशन पातुर येथे जुगाराची काय वाडी करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर श्री गोकुळराज यांनी केली असून यावेळी त्यांच्यासह HC सय्यद शारिक HCसंतोष सोळंके HCसंतोष करंगळे NPC सतीश वाडेकर PCगजानन शिंदेPC विठ्ठल उकर्डे PSI अनिल भुसारी ASI171 यासह HC1059 HC1147,PC1511,PC2172 आधी कारवाई वेळी उपस्थित होते

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: