Saturday, December 21, 2024
Homeसामाजिकछत्रपतींच्या पुतळ्यातील भ्रष्टाचारचा निषेध व कारवाई करण्याची मागणी...

छत्रपतींच्या पुतळ्यातील भ्रष्टाचारचा निषेध व कारवाई करण्याची मागणी…

हेमंत जाधव

मालवण येथील नुकताच आठ महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेला राजा शिवछत्रपतींचा पुतळा हा ढासळला यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान तसेच हा पुतळा उभारण्यात झालेला हलगर्जीपणा व झालेला भ्रष्टाचार हा फार गंभीर विषय आहे.

याकरिता पुतळा निर्मिती बाबत संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभाग तसेच शिवप्रेमी जनतेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत थेट राज्यपालला निवेदन देण्यात आले.

सर्वप्रथम मा जिजाऊ साहेब तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्याअर्पण करून पुढे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले की थोर महापुरुषांच्या पुतळा उभारणी मध्ये जर भ्रष्टाचार होईल तर हा चिंतनाचा विषय आहे.

ज्यांनी देश हितासाठी लोक हितासाठी कार्य केले ज्यांच्या प्रति तुम्हा आम्हा सर्वांना आस्था आहे त्यांचा कुठे अवमान तसेच विटंबना झाली तर तुमच्याआमच्या आपल्या सर्वांच्या भावना दुखावल्या जातात मालवणच्या घटने आपल्या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे सदर घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच या घटने संदर्भात दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी ही मागणी करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: