बाभूळगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार देवानंद गहिले यांचा नागरी सत्कार…
पातुर – निशांत गवई
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे नागरिक पत्रकार यांचे कडे न्यायिकदृष्ट्या पाहते त्यामुळे ग्रामीण पत्रकारांनी आपले पत्रकारितेचे कर्तव्य बजावित असताना लोकाभिमुख आणि निष्ठेने पत्रकारिता करावी जेणेकरून सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले यांनी केले आहे.
27 ऑगस्ट 2024 रोजी पातुर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्या सत्काराचे आयोजन बाभूळगाव येथील ज्येष्ठ नागरिक भाजपाचे कार्यकर्ते माजी सरपंच श्री संजय भाऊ फाटकर यांच्यासह ग्रामस्थांनी केले होते.
याप्रसंगी देवानंद गहिले यांनी सत्काराप्रसंगी विविध विचार व्यक्त करून या सन्मानाने प्रेरणा आणि ऊर्जा मिळते नवीन कार्य करण्याची नवीन उमेद निर्माण होते पत्रकारांच्या पाठीमागे ग्रामस्थांचे पाठबळ अतिशय महत्त्वाचे आहे असे म्हणून सत्कार बद्दल बाभुळगाव ग्रामस्थांचे श्री गहिले यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाभुळगाव येथील सरपंच संजय भाऊ फाटकर तर आभार प्रदर्शन भाजपाचे जिल्हा पदाधिकारी गजानन निमकाळे यांनी केले या कार्यक्रमाकरिता बाभूळगाव येथील पोलीस पाटील विनायकराव पाचपोर, गुलाबराव देशमुख, मनोहर भाऊ पाचपोर, गजानन फाटकर, किसनराव गावंडे ग्रामपंचायत सदस्य, सुधाकर गायकवाड,
सुनील गायकवाड, गजानन निमकाळे, श्रीकांत महल्ले, गणेश महल्ले, अनिल गावंडे तंटामुक्ती अध्यक्ष, नारायणराव भगत ग्रामपंचायत सदस्य, विलास गावंडे, अरुण फाटकर, विनोद राऊत, प्रकाश फाटकर, नागेश फाटकर,
प्रकाश फाटकर, स्वप्निल फाटकर, मंगेश फाटकर, नारायण फाटकर, लक्ष्मण काष्टे, प्रमोद फाटकर, गिरीश फाटकर, अमोल फाटकर, नरेश पाचपोर, विशाल भाकरे, नारायण पाटखेडे, संदीप फाटकर यांच्यासह बाभुळगाव येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.