मुंबई – गणेश तळेकर
रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट- मुंबईच्या वतिने आयोजित, दोन दिवस चालणारी, नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक, एन. एस. डी. चे माजी संचालक पद्मश्री प्रा.वामन केंद्रे यांच्या “मॅजिक ॲाफ ॲक्टींग ॲन्ड स्पीच ” अर्थात “अभिनय व संभाषणाची जादु” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन येत्या शनिवार व रविवार दिनांक २७ व २ ८ एप्रील २०२४ या दिवशी राजर्षी शाहु सभागृह, दादर येथे सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.सदर कार्यशाळा ही १६ ते ६० वर्ष या वयोगटातील कलांवतांसाठी असणार आहे.
प्रा. वामन केंद्रे यांचं अभिनय व नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान हे अमूल्य व बेजोड आहे. आत्तापर्यंत केंद्रे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर , मॉरीशस इत्यादी देशांबरोबरच भारत भर ४०० च्यावर कार्यशाळा घेवुन राष्ट्रीय आंतरीष्ट्रीय दर्जाचे कलाकार घडवले आहेत.
या कार्यशाळेत अभिनयाची व संभाषणाची जादु काय असते, या क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी काय करावे लागते तसेच अभिनयाचे प्रकार, अभिनयाच्या शैली, भुमिकेचा अभ्यास, संभाषण म्हणजे काय? त्याचे मुळ व्याकरण, प्रभावी संभाषण ची तत्वे कोणती या विषयीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. नाटक,चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, वेब सिरिज, रेडिओ, व्हाईस ओव्हर आदि माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार दिग्दर्शनही केले जाईल.
ही कार्यशाळा निःशुल्क असुन या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व अभिनय व आवाज या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या कलावंतानी सदर कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी 7039475537/ 9820868628 या नंबरवर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे अथवा [email protected] येथे संपर्क साधावा असे आवाहन रंगपीठ थिएटर मुंबईच्या गौरी केंद्रे यांनी व छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले आहे.