Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यAkola Loksabha | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या अकोल्यात…

Akola Loksabha | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या अकोल्यात…

Akola Loksabha : भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या अकोला दौऱ्यावर असणाऱ आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी त्यांची जाहीर सभा अकोल्यात उद्या पार पडणार आहे.

उद्या 23 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची जाहीर प्रचार सभा होतीय. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आमदार संजय कुटे, तसेच अकोला जिल्ह्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे भाजपचे अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोल्यात पहिलीच एका बड्या नेत्याची सभा होत आहे. 21 एप्रिल रोजी योगी आदित्यनाथ यांची सभा होणार होती. मात्र काही कारणामुळे ती सभा रद्द करण्यात आली होती आता अमित शहा यांची प्रचार सभा होत आहे.

दरम्यान अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यातही अतिशय रंजक लढत होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: