सांगली – ज्योती मोरे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रेरणा ज्योत मित्र मंडळ सोनी, तालुका- मिरज यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी असलेल्या चौंडीतून आणलेल्या ज्ञानज्योतीचे आज विश्रामबाग चौकात स्वागत करण्यात येऊन मिरवणुकी काढण्यात आली.
यावेळी संयोजक नगरसेवक विष्णू माने, आमदार सुधीर गाडगीळ,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील,काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील,नगरसेवक कल्पना कोळेकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार,नगरसेविका सविता मदने, माजी महापौर मैनुद्दीन बागवान,
जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, उद्योग अधिकारी तात्यासो खांडेकर, प्राथमिक शिक्षण विभाग अधीक्षक रेखा आलदर, जिल्हा ग्राहक न्यायाधीश संगीता धायगुडे आदी मान्यवरांसह इतर अनेक मान्यवर तसेच नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.