President Ebrahim Raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणी बचाव पथक रेड क्रेसेंट तासांच्या परिश्रमानंतर हेलिकॉप्टर अपघाताच्या ठिकाणी पोहोचले असता तेथे कोणीही जिवंत राहले नसल्याचे दिसत आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी पूर्व अझरबैजानला भेट देत होते. दरम्यान, इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या अझरबैजानच्या सीमावर्ती शहर जोल्फाजवळ हा अपघात झाला.
या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्राध्यक्ष रायसी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायान यांच्यासह एकूण ९ जण होते आणि या सर्वांचा अपघातात मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इब्राहिम रायसी यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्यानंतर इराणची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणून घ्या इराणची राज्यघटना काय म्हणते…
BREAKING: MANY BODIES OF THOSE DIED IN IRAN PRESIDENT RAISI HELICOPTER CRASH HAVE BEEN BURNT AND CANNOT BE IDENTIFIED pic.twitter.com/ilM0ohOmnZ
— Sulaiman Ahmed (@ShaykhSulaiman) May 20, 2024
इराणच्या राज्यघटनेनुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्षाचा अचानक मृत्यू झाल्यास, कलम 131 नुसार, प्रथम उपराष्ट्रपतींना जास्तीत जास्त 50 दिवसांसाठी ही जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र, यासाठी इराणचे सर्वोच्च नेते म्हणजेच अयातुल्ला खामेनी यांची मंजुरी आवश्यक असेल. त्यानुसार इराणचे पहिले उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांना आता राष्ट्राध्यक्ष बनवता येईल.
यानंतर, उपराष्ट्रपती, संसदेचे अध्यक्ष आणि न्यायपालिकेच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या परिषदेला जास्तीत जास्त 50 दिवसांच्या आत नवीन राष्ट्रपतीसाठी निवडणुकीची व्यवस्था करावी लागेल. इब्राहिम रायसी 2021 मध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि आता पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका 2025 मध्ये होणार होत्या. मात्र, आता त्यांच्या निधनानंतर पुन्हा तेथे लवकरच निवडणुका होणार आहेत.
उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर कोण आहेत?
इराणमध्ये प्रथम उपराष्ट्रपती हे पद निवडून आलेले नसून नियुक्त केलेले पद असते, म्हणजेच त्यासाठी कोणत्याही निवडणुका नसतात, परंतु राष्ट्रपती स्वत: त्यांच्या सहाय्यकाची नियुक्ती करतात. रायसी यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच मोखबर यांची प्रथम उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
BREAKING: TRANSFERRING OF BODIES FROM HELICOPTER CRASH INVOLVING IRAN PRESIDENT RAISI pic.twitter.com/b8J78VC0S0
— Sulaiman Ahmed (@ShaykhSulaiman) May 20, 2024