Wednesday, January 1, 2025
Homeराज्यलातूर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी प्रयागअक्‍का आरोग्य सूरक्षा योजना लागू - आ.रमेशअप्पा कराड...

लातूर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी प्रयागअक्‍का आरोग्य सूरक्षा योजना लागू – आ.रमेशअप्पा कराड…

व्हॉईस ऑफ मिडीयाचा झेंडा 195 देशात फडकविण्याचा संकल्प – संदीप काळे

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या माध्यमातून जिल्हातील १७० आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड वाटप आणि सर्व रोग तपासणी.

रामटेक – राजु कापसे

पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हॉईस ऑफ मिडीयाने ज्या पद्धतीने जगभर काम सुरू केले आहे त्या व्हॉईस ऑफ मिडीयाच्या हाकेला ओ देत लातूरमधून पत्रकारांच्या आरोग्यासाठी एमआएमएसआरआय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने प्रयागअक्‍का कराड आरोग्य सूरक्षा योजना लागू केली अशी घोषणा आ. रमेशअप्पा कराड यांनी केली. व्हॉईस ऑफ मिडीयाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासाठी ही योजना असेल असेही ते म्हणाले.

व्हॉईस ऑफ मिडीया राष्ट्रीय संघटना, एमआयएमएसआरआय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबीर व आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वितरण कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, सचिव दिव्या भोसले, रुग्णालयाचे अधिष्ठाता एन.जी.जमादार, व्हॉईस ऑफ मिडीया शैक्षणिक विंगचे प्रदेशाध्यक्ष चेतन कात्रे, व्हॉईस ऑफ मिडीयाचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडीया, व्हॉईस ऑफ मिडीयाचे लातूर जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार,

मराठवाडा संघटक बालाजी फड,शहाजी पवार, बाळासाहेब जाधव, इलेक्ट्रॉनिक विंगचे अध्यक्ष निशांत भद्रेश्‍वर, डिजिटल मिडीया विंगचे अध्यक्ष डॉ.सितम सोनवणे, साप्‍ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष विष्णू आष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मिडीया चे लातूर जिल्हाध्यक्ष संगम कोटलावार यांनी केले.

मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, यशंवतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता एन.पी.जमादार आदींनी विचार मांडले. प्रातिनिधीक स्वरूपात पाच सदस्यांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच पुरस्कार प्राप्‍त प्रतिनिधींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मनित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सितम सोनवणे यांनी केले तर आभार शहाजी पवार यांनी मानले.यावेळी या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. १७० व्हॉईस ऑफ मिडीयाच्या पदाधिकारी आणि सदस्य यांना आयुष्यमान भारतचे प्रत्येकी ५ लाख रुपयाचे कार्ड देण्यात आले.

व्हॉईस ऑफ मिडीयाचा झेंडा 195 देशात फडकविण्याचा संकल्प – संदीप काळे

पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियासाठी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाची ४१ देशात असलेली पताका १९५ देशात वाढवून पत्रकारांच्या विश्‍वासास पात्र असे काम करण्याचा संकल्प सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेला आहे.

देशातील पत्रकारांसह लातूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितांचे काम एखाद्या चळवळीप्रमाणे राबवून जगामध्ये व्हॉईस ऑफ मिडीयाचा झेंडा फडकविण्याचा संकल्प पूर्ण करायचा आहे. यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी, सदस्यांनी साथ देण्याचे काम करावे व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: