भारतातील सामाजिक समानता” या विषयावर आधारित 7 वी राष्ट्रीय परिषद 2024 आणि पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगि भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध पौर्णिमा उत्सव 2024 आणि राजर्षी शाहू महाराजांचा 150 वी जयंती 2024 आणि “महात्मा ज्योतिबा फुले” व भारतरत्न डॉ. बी.आर.आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयी प्रबोधन करण्यात आले, तसेच भारतातील सामाजिक समानता क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट उद्योजक राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा यूनिवर्स एक्सपोर्टचे संचालक शेतकरीपुत्र प्रवीन चांगदेवराव वानखडे यांना श्रीमती रिंचेन लामो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माननीय सदस्य बौद्ध अधिष्ठाता अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय भारत सरकार, डॉ. एस. एन. पठाण माजी कुलगुरू रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, शिर्डीचे खासदार माननीय भाऊसाहेब वाकचौरेंशी आणि म्हाडाचे माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तसेच डॉ. संजय कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत, डॉ. मनीष गवई, डॉ. गोरख साठे व आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण भारतात पिकणारा भाजीपाला, फळे व इतर शेतीमाल निर्यातीसाठी युनिव्हर्स एक्स्पोर्ट तत्पर असून सरकारच्या सहयोगातून व सामाजिक दायित्त्व तसेच सामूहिक प्रयन्त केल्यास येणाऱ्या काळात शेतीमाल निर्यातीत आघाडी घेत महाराष्ट्र राज्यातिल शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न करण्यासाठी एक शेतकरी पुत्र निर्यातदार म्हणून आपल्या सेवा प्रदान करणार असल्याचे प्रतिपादन प्रवीण वानखडे यांनी केले.
यूनिवर्स एक्सपोर्ट कंपनी हे ऐक एक्सपोर्ट कंपनी नसून महाराष्ट्रा बरोबरच ऑल ओवर इंडिया चे शेतकरी वर्गासाठी एक हक्काचं ज्ञानपीठ उदयास आलेलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था सुधारून शेतकरी वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी हे कंपनी कार्य करून आपले सामाजिक उत्तदायित्व निभावत असते.