Monday, June 24, 2024
spot_img
Homeमनोरंजनप्रशांत दामले यांचा (रंगकर्मी नाटक समूह पॅनलच) विजय नक्की..!

प्रशांत दामले यांचा (रंगकर्मी नाटक समूह पॅनलच) विजय नक्की..!

नाट्यक्षेत्रात एकच चर्चा प्रशांत दामले पॅनलच येणार…!

मुंबई – गणेश तळेकर

प्रसिद्ध अभिनेते / निर्माता / नाट्यकर्मी प्रशांत दामले यांच्या ” रंगकर्मी नाटक समूह पॅनल ” चे उमेदवार आणि कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन चर्चा , दादर येथील विद्याधर हॉल , येथे संपन्न झाली. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पंचवार्षिक निवडणूक २०२३ – २०२८.च्या १६ एप्रिल २०२३ च्या होणाऱ्या निवडणूक सकाळी ९.३० ते ५.३०. यावेळेस होणार आहे.

या मार्गदर्शन चर्चेला उमेदवार श्री. विजय केंकरे ,श्री दिलीप जाधव ,श्री विजय सूर्यवंशी ,श्रीमती वैजयंती आपटे,आणि श्री.नितीन लाड,नाट्यव्यवस्थापक – हरी पाटणकर ,संतोष शिदम.विशाल हळदणकर, विलास दाते. साहित्य संघ नाट्य मंदिर चे सदस्य , नाट्यव्यवस्थापक ,मध्यवर्ती नाट्य परिषद चे सर्व सदस्य मोठया प्रमाणात या चर्चेला उपस्थित होते,

चर्चेत अनेक विषय मांडण्यात आले, निवडणुकीत नाट्य परिषद चे सदस्य ( मतदार ) यांना कसे contact करून त्यांना आपल्या *रंगकर्मी नाट्य समूह पॅनल ला मतदान का करावे हा विषय घेण्यात आला. विजय केंकरे , दिलीप जाधव , विजय सूर्यवंशी , दिलीप दळवी, हरी पाटणकर, संतोष शिदम,राजू राणे अनेक अनुभवी मान्यवर व्यक्तींनी आणि नितिन लाड ( मार्गदर्शन चर्चा शिबीर प्रमूख ) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी अनेक अनुभवी / नवीन सदस्य यांनी प्रशांत यांच्या पॅनलला मोठ्या संख्येने जाहीर पाठिंबा दिला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: