मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिली शिवटेकडी येथे भेट…
अमरावती – मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शिवटेकडी येथे भेट दिली. यावेळी शिवटेकडी येथे महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. भेटी दरम्यान गटनेता दिनेश बुब यांच्याशी सदर कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवटेकडी येथे महानगरपालिकेतर्फे अनेक प्रकल्प राबविण्यात येते. शिवटेकडी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून त्याची आताची स्थिती काय आहे याची यावेळी पाहणी करण्यात आली.
शिवटेकडी येथे महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, अभियंता दिनेश हंबर्डे यांच्या हस्ते सुध्दा वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शिवटेकडी येथे ३०० झाडे लावण्यात आली.
शिवटेकडी सौंदर्यीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. आकर्षक स्वरुपात, हृदयाला भुरळ घालणा-या या टेकडीच्या झाडांच्या आजूबाजूला सजावट केली गेली आहे. असंख्य नागरिक या टेकडीवर शुध्द हवा मिळावी या हेतुने फिरण्यासाठी येतात. टेकडीच्या सौंदर्यीकरण आणि देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असून महानगरपालिकेने दगडांची आकर्षक रंगांनी सजावट केली आहेत. अशाच काही ठिकाणी आकर्षक दगडांची रचना सुध्दा करण्यात आली.
मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सदर कामाचे कौतुक केले व या संदर्भात कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास पुढाकार घेतला जाईल. शिवटेकडीचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे आल्यावर मनाला वेगळाच आनंद होतो. सदर परिसर हा नेहमी हिरवागार राहाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. या टेकडीचे सौंदर्य आपण सगळे मिळून टिकवू या असे आयुक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले.