Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeराज्यखासदार अशोकराव चव्हाण यांनी सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी केंद्रात प्रयत्न करावेत - प्रल्हाद...

खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी केंद्रात प्रयत्न करावेत – प्रल्हाद इंगोले…

नांदेड – महेंद्र गायकवाड

केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे गतवर्षीपासून सोयाबीनचे दर कमालीचे घसरलेले आहेत. त्यात बदल करून सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण व अन्य खासदारांनी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने आणलेली आहे राज्य सरकारचे लोकोपयोगी काम सर्वत्र पोहोचत आहे.

शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला आहे हे नं विसरता आपल्या लेकीच्या राजकीय पुनर्वसनासाठी गावा-गावात जाऊन योजनेच्या उद्घाटन निमित्ताने राज्य शासनाच्या योजनेचे क्रेडिट घेण्याचे प्रकार थांबवून राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्र दरबारी आपले वजन वापरून सोयाबीन व अन्य शेती चकार शब्दही का बोलत नाहीत असा संतप्त सवाल शिवसेना प्रणित शेतकरी सेना कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी उपस्थित केला.

गतवर्षीपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर पडलेले आहेत, अनेक शेतीमाल हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहेत, भाऊराव सह अनेक साखर कारखान्यांनी उसाच्या एफ आर पी चे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिले नाहीत याची राजकीय फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बसला यावर मार्ग काढण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे खासदार अशोकराव चव्हाण हे आपल्या लेकीच्या राजकीय पुनर्वसनासाठी गावोगावी जाऊन राज्य सरकारच्या योजनांचे उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारचे काम पोहोचत आहे.

मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना राबवण्याचे काम प्रशासन चांगल्या पद्धतीने करत आहे योजनेला सरकारने मुदतवाढही दिली आहे त्याचे क्रेडिट घेण्याचा केविलवाना प्रयत्न होताना दिसतोय. राज्यात पुन्हा माहितीचे सरकार आणायचे असेल तर अशोकराव चव्हाण यांनी आपल्या आपल्या लेकीच्या राजकीय पुनर्वासनापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन सोयाबीन सह अन्य शेतीमालाचे भाव वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा माहिती सत्तेत येणे आवघड होईल असा घरचा आहेर मित्र पक्षाचे शेतकरी सेना कार्याध्यक्ष तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: