रामटेक – राजू कापसे
समर्थ शाळेच्या प्रांगणात ५ जून रोजी सकाळ समुह आणि सृष्टी सौंदर्य बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विधमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने रामटेक शहरातील समर्थ शाळा,समर्थ काॅंन्व्हेंट येथे बुधवारी सकाळी ८ वाजता डाॅक्टर तसेच शाळेतील शिक्षक यांच्या उपस्थीत भव्य वूक्षारोपण करण्यात आले. जांभुळ, चिचवा, कडुनिंब, चिंच आणि विविध प्रकारचे ५० झाडे लावण्यात आले.
यावेळी सृष्टी सौंदर्य बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष ऋषीकेश किमतकर, डाॅ.बापू सेलोकर,वसंतराव डांमरे,राजेश बाकडे,भुषण देशमुख,विनोद शेंडे,नामदेव राठोड,पराग पंडे,रवि मथुरे,मानद सेलोकर,श्रीपती देशमुख,पराग किमतकर,सकाळ समुहाचे राजु कापसे,नागपूर वितरण विभागाचे विजय चरडे,जगदिश सांगोडे सह आदी मान्यवर उपस्थीत होते.