रामटेक – राजु कापसे
नगरपालिका रामटेक मार्फत सर्व थकीत मालमत्ता कर धारकांना व थकीत पाणीपट्टी धारकांना कर भरना करण्याची विनंती रामटेक नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी राउत यानी केली आहे. त्या म्हणाल्या की आर्थिक वर्षातील शेवटचे 4 दिवस नगरपालिका कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर भरणाकरिता उघडे राहील.
नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला कर तात्काळ भरणा करावा. भरणा करावा. कर भरणा न केल्यास
महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत,औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अनव्ये दिनांक 1 एप्रिल 2024 पासून थकीत करावर 2% मासिक व्याज म्हणजेच 24% वार्षिक व्याज आकारणी करण्यात येईल.
तसेच 5000 पेक्षा अधिक थकीत कर असलेल्याची मालमत्ता जप्ती तसेच नळ जोडणी खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी दंड तसेच मालमत्ता जप्तीसारखी कठोर कार्यवाही टाळण्याकरिता तात्काळ कर भरणा करावा असी विनंती केली आहे.