पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील सस्ती आरोग्य उपकेंद्र अंतर्गत खेट्री येथे शुक्रवारी क्षयरोग मुक्त कार्यक्रम व जन आरोग्य समितीची सभा घेण्यात आली, 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने क्षयरोगमुक्त कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे.
गावामधून जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्ण शोधून ज्या गावांमध्ये दोन पेक्षा कमी क्षयरुग्ण निघतील, त्या गावाला पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल या हेतूने खेट्री येथे क्षयरोगमुक्त कार्यक्रम घेण्यात आला, मात्र गावात एकही क्षयरुग्ण आढळून आला नाही, त्यामुळे खेट्री ग्राम पंचायतचे सरपंच जहुर खान, यांना स्वर्ण पथक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. नितीन युटे, सरपंच जहुर खान, सचिव राजेश जटाळे, सदस्य शेख साजिद, आरोग्य सेवक राजेश मानकर, प्रतिभा वानखडे, गोपाल राऊत, मांजरे ताई, वनिता तिडके, शेख अयुब, मधु पाटील व गावातील बहुसंख्या ग्रामस्थ उपस्थित होते.