पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव येथे शिवाजी चौकात दोन सख्ख्या भावावर धारदार शास्त्राने हल्ला केल्याची घटना २९ मार्च रोजीच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात चेतन शामराव काळदाते, दीपक शामराव काळदाते, हे दोघे भाऊ गंभीर झाल्याने त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले होते.
आईच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आलेगाव येथील आरोपी महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक, दीपक प्रल्हाद धात्रक यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, तेव्हापासून गंभीर दोघे भावावर अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. अखेर ३ एप्रिल रोजी चेतन काळदाते या युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चान्नी पोलिसात हत्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे करीत आहे.