हजारो उपासक,उपसिका यांनी केले वंदन
पातूर : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या चतारी गावात २८ फूट लांब २८ तासात २८ डिसेंबर २०१६ रोजी महापरिनिब्बान अवस्थेतील बुद्धमूर्ती स्थापना करण्यात आली होती . त्याबाबत बुधवार रोजी वर्धापन दिन व चिवर प्रदान सभारभ कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी विश्वशांती बुद्ध विहारात सकाळी ७ वाजता धम्मध्वजारोहन,परित्रणपाठ, सकाळ ११ वाजता चिवरप्रदान ,दुपारी १२ ते १ भिक्खू धमदेसना, दुपारी १ ते २ सामाजिक प्रबोधन,२ ते ६ भोजनदान,बुद्धभिम गीताचा कार्यक्रम पार पडला आहे.
जगदविख्यात बुद्धमुर्ती शिल्पकार सुरेश खंडेराव यांच्या संकल्पनेतून बुद्धांच्या मुर्तीला सहा वर्ष पुर्ण झाले आहे.या कार्यक्रमाला भदंन्त गुणरत्न महाथेरो , भदंन्त विनयपाल थेरो, भदंन्त प्रज्ञादिप थेरो हे धम्मदेसना देतील या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. विशाल नंदागवळी तर प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जि प अध्यक्षा संगिता अढाऊ, जि प उपाध्यक्ष सुनिल फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, सामाजिक न्याय मानवाधिकार संरक्षण संघाचे अध्यक्ष विजयकुमार गडलिंगे, पातुर तालुका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ,वंचित बहुजन आघाडी पातुर तालुका संघटक चंद्रकांत तायडे, पातुर पं स सभापती सुनिता अर्जुन टप्पे, उपसभापती इम्रान खान मुमताज खान हे प्रमुख उपस्थितीत होते.