Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | महाव्हाईस Impact....अखेर तो विवाहितेचा विनयभंग करणारा पोलीस हवालदार निलंबित...

पातूर | महाव्हाईस Impact….अखेर तो विवाहितेचा विनयभंग करणारा पोलीस हवालदार निलंबित…

निशांत गवई, पातूर

पातुर : तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेच्या घरात घुसून द्वार बंद करून आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना २३ एप्रिल रोजी उघडकीस आली, पोलीस कर्मचारी २३ एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि द्वार बंद केला, व विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केली.

महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी घरातून पळ काढला सदर घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास एन्काऊंटर करून जीवे मारण्याची धमकी दिली,आणि भ्रमणध्वनीवरून वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्या बाबतचे पोलीस कर्मचाऱ्यांचे बोलणे पीडित महिलेने रेकॉर्ड केले आहे. असा आरोप विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे ६ मे रोजी दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

सदर तक्रारीवर चान्नी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांच्या विरुध्द ११ मे रोजी विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांना ११ मे रोजीच्या संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहे. त्यामुळे पोलीस विभागात एकच खडबड उडाली आहे. याप्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांनी चान्नी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: