Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीचक्क ८२ वर्षीय वृद्धेवर बलात्कार…आकोट न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आरोपीचा जामीन…

चक्क ८२ वर्षीय वृद्धेवर बलात्कार…आकोट न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आरोपीचा जामीन…

आकोट – संजय आठवले

८२ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बळजोरीने बलात्कार केल्याचे आरोपात अकोला कारागृहात बंदिस्त असलेल्या शैलेश अरुण वाघोडे राहणार पाटसुल वय ३५ वर्षे या इसमाचा जामीन अर्ज आकोट न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे.

या घटनेची हकीकत अशी कि, दिनांक २८.१२.२३ रोजी पोलीस ठाणे दहीहंडा येथे तक्रार दाखल करण्यात आली की, पाटसूल येथे राहणारा शैलेश अरुण वाघोडे या ३८ हा ८२ वर्षीय फिर्यादी महिलेच्या घरात रात्री आठ वाजता चे सुमारास बळजोरीने घुसला. घरात घुसल्यावर त्याने दोन्ही दारे आतून लावून घेतली. त्यावेळी सदर महिला घरात असताना त्याने अचानक तिचे डोके भिंतीवर आपटून तिला शक्तीहीन केले. आणि गलथान अवस्थेत तिला पलंगावर पाडून तिच्यावर बळजोरीने बलात्कार केला.

सोबतच या वृद्धेला अश्लील शिवीगाळ करून सदर प्रकार कोणालाही न सांगणे करिता धमकाविले. त्यावर पोलिसांनी घटनेची तत्काळ दखल घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आणि आरोपीस ताबडतोब अटक करून ताब्यात घेतले. त्याच दरम्यान पीडित वृद्धेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये पीडीतेच्या दोन्ही स्तनांवर चावल्याच्या खुणा आढळून आल्या. सोबतच तिच्या दोन्ही गुडघ्यांना घर्षण झाल्याचे दिसून आले.

या संदर्भात दिलेल्या वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद आहे की, फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास करून आरोपी विरोधात आकोट न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. अटकेपासून आरोपी कारागृहातच बंदिस्त आहे. त्यामुळे जामिनावर सुटणेकरिता त्याने आकोट न्यायालयात अर्ज दाखल केला.

ह्या अर्जाला सरकारी वकील अजित देशमुख यांनी कडाडून विरोध करीत आरोपीस कारागृहात बंदिस्त ठेवूनच खटला चालवावा अशी न्यायालयास विनंती केली. आपल्या युक्तीवादात त्यांनी पुढे म्हटले की,
फिर्यादी महिला ही विधवा आहे, आरोपी हा तिच्याशेजारी राहणारा असुन त्याने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. आरोपी हा अतिशय हिन मानसिकतेचा असुन त्याने केलेले
कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. आरोपीला जामीनावर सोडल्यास तो फिर्यादी
व इतर साक्षीदारावर दबाव टाकण्याची शक्यता आहे. तसेच आरोपी जामीनावर सुटल्यास
त्याचे मनोधैर्य वाढेल आणि तो अशाच प्रकारचे गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे व त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करण्यात यावा व त्याला कारागृहातच बंदीस्त ठेवण्यात यावे असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी विद्यमान न्यायालयात केला.
दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर केला
आहे. या प्रकरणाचा तपास दहिहांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरूण मुंढे यांनी पूर्ण
करुन दोषारोप पत्रक न्यायालयात दाखल केले आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: