Patna Accident : बिहारमधील पाटणा येथे एक वेदनादायक अपघात (Patna Road Accident) घडला आहे. जेसीबी आणि अनियंत्रित ऑटो यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही हृदय पिळवटून टाकणारी घटना पाटणातील कांकरबाग पोलीस स्टेशन हद्दीतील रामलखान पथ येथे मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका अनियंत्रित ऑटोने पाटणा मेट्रोसाठी काम करणाऱ्या जेसीबीला थेट धडक दिली.
पटना में दर्दनाक सड़क हादसा, ऑटो और जेसीबी की टक्कर में 7 लोगों की मौत….#patna #Bihar #BiharPolice #Accident #autos #nedricknews @bihar_police @BJP4Bihar pic.twitter.com/9mWpHaZwba
— Nedrick News (@nedricknews) April 16, 2024
हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा तपास सुरू आहे. पाटणा येथे झालेल्या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.