Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यPetrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल...सर्वात स्वस्त या शहरात...जाणून...

Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल…सर्वात स्वस्त या शहरात…जाणून घ्या किंमत…

Petrol Diesel Price : देशात लोकसभा निवडणुका सुरु असतांना मोदी सरकार ने जनतेवर मेहरबानी करत डीझेल आणि पेट्रोलच्या दारात काही प्रमाणात कापत केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती आज म्हणजेच 16 एप्रिल 2024 रोजी देशभरात जाहीर झाल्या आहेत. देशातील सर्व शहरांसाठी सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट केले जातात.

त्यानुसार आज राष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त झाले आहे. त्याच वेळी, अशी अनेक राज्ये आहेत जिथे पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today) स्थिर आहेत.

अशा परिस्थितीत पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी जाण्यापूर्वी तुमच्या शहरात आज (Today Petrol Diesel Price) पेट्रोल आणि डिझेल किती दरात उपलब्ध आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price)

  • दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये आणि डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे.
  • मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.
  • कोलकात्यात पेट्रोलचा दर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये प्रति लिटर आहे.
  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये आणि डिझेलचा दर 92.34 रुपये प्रति लिटर आहे.

या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे (Petrol-Diesel Rates)

राज्य पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत बोलायचे झाले तर महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. येथे पेट्रोलची किंमत (Petrol Price in Maharashtra Today) 49 पैशांनी कमी होऊन 104.27 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel Price in Maharashtra) 46 पैशांनी कमी होऊन 90.80 रुपये प्रति लिटर झाले आहे.

याशिवाय आसाम, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.

दुसरीकडे आंध्र प्रदेश, गोवा, जम्मू-काश्मीर, केरळ, ओडिशा, पुद्दुचेरी, तेलंगणा आणि यूपीमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: