Papua New Guinea Landslide : एन्गा, पापुआ न्यू गिनी येथे रविवारी झालेल्या भूस्खलनामुळे 670 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याला दुजोरा देताना संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे कर्मचारी गावकऱ्यांसोबत काम करत आहेत. या भूस्खलनामुळे 150 हून अधिक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत, असे यूएन मायग्रेशन एजन्सीचे अधिकारी सेरहन अक्टोप्राक यांनी सांगितले. अपघातानंतर लगेचच त्यांनी दीडशेहून अधिक लोकांचा बळी जाण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली.
अक्टोप्रक पुढे म्हणाले की, परिस्थिती खूप वाईट आहे, अजूनही जमीन सरकत आहे. पाणी वाहत असून त्यामुळे सर्वांनाच मोठा धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतात हा अपघात झाला. पहाटे लोक घरात झोपले असताना हा अपघात झाला. अक्टोप्रक पुढे म्हणाले की लोक त्यांच्या प्रियजनांचा शोध घेण्यासाठी काठ्या, कुदळ आणि शेती उपकरणे वापरत आहेत.
Drone video reveals extent of the damage caused by a landslide in Papua New Guinea, which killed more than 670 people according to the UN.
— Al Jazeera English (@AJEnglish) May 26, 2024
Rescue workers are trying to retrieve bodies from under the mud. pic.twitter.com/SPvUjdeaQF
१ हजाराहून अधिक लोक प्रभावित
या आपत्तीमुळे 1000 हून अधिक लोकांना घरे सोडावी लागली असून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सुरुवातीला एजन्सींना वाटले की या दुर्घटनेत 300 लोकांचा मृत्यू झाला असावा, परंतु नंतरच्या आकडेवारीनुसार या गावात 4 हजारांहून अधिक लोक राहत होते. या गावातील बहुतेक लोक सोन्याच्या खाणीत काम करायचे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ५० हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार भूस्खलनाचे कारण गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस आहे. जागतिक बँकेच्या मते, पापुआ न्यू गिनीचे हवामान जगातील सर्वात आर्द्र हवामान असलेल्या देशांमध्ये आहे. येथे आर्द्र डोंगराळ भागात सर्वाधिक पाऊस पडतो.