Monday, December 23, 2024
Homeराज्यश्रीराम नवमीला गडमंदीरावर होणार रामनामाचा गजर - रामनवमीच्या दिवशी गडमंदीरावर उसळणार अलोट...

श्रीराम नवमीला गडमंदीरावर होणार रामनामाचा गजर – रामनवमीच्या दिवशी गडमंदीरावर उसळणार अलोट गर्दी…

रामटेक – राजु कापसे

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत प्रख्यात असलेल्या रामनगरी (रामटेक) मध्ये उद्या दि. १७ एप्रील ला गडमंदीरावर श्रीराम नवमी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रामनवमी च्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीपासुनच गडमंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. गडमंदीर उंच असल्याकारणाने रात्रीच्या सुमारास जवळपास १५ किलोमिटरपासुनही हा रामगड दिसुन येत असतो हे विशेष. रामनवमी च्या दिवशी गडमंदीरावर विविध धार्मिक कार्यक्रम, विधिवत पुजा अर्चना पार पडत असतात.

दरम्यान या दिवशी दिवसभर गडमंदीरावर रामनामाचा जयघोष सुरु असतो. किर्तनकारांचे किर्तन सुरु असते. यादिवशी मोठ्या संख्येने येथे दिंड्या येत असतात. दुपारी १२ वाजताच्या सुमारास येथे दहीकाल्याचा कार्यक्रम होत असतो. यावेळी येथे हजारो भक्तगण उपस्थित असतात.

लोकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी येथे देवस्थानच्या रिसीव्हर एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांचे मार्गदर्शनात निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर हे आपल्या सुरक्षा रक्षकांसह तटस्थ असतात. यादिवशी दिवसभरच येथे हजारो भक्तगणांची रेलचेल सुरु असते. बाहेरगाववरून तथा दुरदुरुन मोठ्या संख्येने येथे भक्तगण येत असतात.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: