सांगली – ज्योती मोरे.
सांगलीतील ओम रुद्र ढोल ताशा आणि ध्वज पथकाच्या वाद्यांची पूजा आज तरुण भारत स्टेडियम मधील हॉलमध्ये ज्येष्ठ ताशा वादक राजन घाणेकर, समर्थ प्रतिष्ठान पुण्याचे गणेश बोज्जी, शिवमुद्रा ढोल ताशा पथक पुण्याचे संकेत गावखडकर, आणि सौ. पूजा मल्लिगे-घोडके आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठय़ा उत्साहात संपन्न झाली.
यावर्षी सांगलीसह महाराष्ट्रात ढोल पथकांचा आवाज जोशात घुमणार असून ओम रुद्र ढोल ताशा पथकाला यशस्वी पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. आजपासून ओम रुद्र ढोल पथकातील सुमारे 150 सभासदांच्या उपस्थितीत वाद्यपूजन सोहळा करण्यात आला.
यावेळी ओम रुद्र ढोल ताशा आणि ध्वज पथकाचे संस्थापक अध्यक्ष ओंकार आनंदा चव्हाण, आणि वादक तसेच रणमर्द पथकाचे शितल सदलगे, स्वराध्यक्ष पथकाचे पंकज पेडणेकर, रौद्रशंभो पथकाचे प्रशांत यादव व महामेरु पथकाचे अभिषेक पाटील, आनंदा चव्हाण यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.