Saturday, December 21, 2024
Homeराज्ययेत्या निवडणुकीत ओबीसींनी मराठा उमेदवारांना मतदान करु नये - प्रकाश आंबेडकर...

येत्या निवडणुकीत ओबीसींनी मराठा उमेदवारांना मतदान करु नये – प्रकाश आंबेडकर…

आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगली घडल्या असत्या…

मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा…

मूर्तिजापूर – ओबीसींचे आरक्षण वाचवायचे असेल तर, ओबीसीतून मराठा आरक्षण नको. ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नका असे आवाहन करत मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप ऍड प्रकाश आंबेडकरांनी केला. ते येथील आरक्षण बचाव यात्रे निमित्य राधा मंगलम येथे पार पडल्या सभेत बोलत होते.

मराठा आरक्षण संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते आहेत पण आम्ही ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला आहे असा उल्लेख करीत, आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगल घडली असती ही यात्रा काढल्याने पूर्ण वातावरण निवळले आहे, आरक्षण यात्रा काढण्याबाबत ते पुढे म्हणाले की, जर शासनाने ठरवले असते, ओबीसी वगळून वेगळे आरक्षण देण्याचे ठरवले असते तर आम्ही ही भूमिका घेतली नसती अशी स्पष्टोक्ती कली.

मुंबईतील चैत्यभूमी येथून २४ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आरक्षण बचाव यात्रेला सुरवात करण्यात आली. या आरक्षण बचाव यात्रेचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सोमवार दि. ५ रोजी आगमन झाले. या यात्रेचे मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सदार यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. तर सदर यात्रेनिमित्य येथील राधा मंगलम कार्यालय येथे ऍड. प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. सदर कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आरक्षण बचाव यात्रेत ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत तालुकाध्यक्ष सुनील सदार, जि. प सदस्य तथा शिक्षण सभापती सौ मायाताई संजय नाईक, जि. प सदस्य तथा सभापती सौ योगिताताई मोहन रोकडे , शहराध्यक्ष तसवर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: