Thursday, September 12, 2024
spot_img
Homeमनोरंजन"तेरे जैसा यार कहा" - मेलोडीज ऑफ अकोला तर्फे संगीतमय मैत्री दिवस...

“तेरे जैसा यार कहा” – मेलोडीज ऑफ अकोला तर्फे संगीतमय मैत्री दिवस साजरा…

अकोला शहरातील संगीतप्रेमी दिग्गज लोकांचा प्रसिद्ध समूह ” मेलोडीज ऑफ अकोला” तर्फे 4 अगस्त आंतराष्ट्रीय मैत्री दिवसाचे औचित्य साधून “तेरे जैसा यार कहा” ह्या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून आगळा वेगळा मैत्रिदिवस साजरा करण्यात आला. स्थानिक हॉटेल च्या सभागृहात 4 अगस्त च्या संध्याकाळी शहरातील सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, सनदी लेखापाल, बांधकाम व्यावसायिक,आरेखक, प्रोफेसर ह्यांनी संगीत हा एक धागा पकडून तयार केलेल्या “मेलोडीज ऑफ अकोला” ह्या ग्रुप ने मैत्री दिनाचे औचित्य साधून फक्त मैत्री ह्या विषयावरील विविध गाणी गाऊन व धमाल करून एक आगळावेगळा “मैत्रिदिवस” साजरा केला.

ह्या संगीतमधुर संध्ये ला विशेष करून अकोल्यातील नामीगिरामी व्यक्ती हजर होत्या, त्या मध्ये कलाश्रय चे संस्थापक राजीवजी बियाणी, अकोला जनता कमर्शियल बँकेचे अध्यक्ष रामकांतजी खेतांन, समाजसेवी अविनाश देशमुख, प्रसिद्ध लेबेन लाईफ सायन्स चे सर्वेसर्वा हरिषजी शहा, शैलेंद्रजी पारेख, गिरीशजी अग्रवाल, ऍड राजू खोत,राजेश भाटी हे गणमान्य व्यक्ती हजर होते. संपूर्ण हॉल हा सुशोभित करण्यात आला होता वह सर्व मित्रानी आप सात मैत्री चे धागे बन्धन आपसातील मैत्री घटट केली.

गजानन शेल्के, संजय खडसे, गिरीश शास्त्री, संतोष अग्रवाल महेंद्र खेतान, अजय सिंगर, मनोज चांडक, विक्रम गोलछा, निधि मंत्री, जयप्रकाश राठी, राजेश पूर्व, आनंद नागले, दीपक चांडक, अतुल अखरे, संजय पिंपर्कर, भूषण तजने, महेंद्र टाव रि, भारती शेडे, अनिल तोषनीवाल, विनीता महेश्वरी, मंजरी अग्रवाल, रश्मि मेहता ह्यन्नी एका पेक्षा एक सरस अशी मैत्री वर आधारित हिट फिल्मी गाणी गाऊन व धमाल करून हा मैत्री दिवस साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे बहारदार संचालन ग्रुप चे संचालक व्यवस्थापक सनदी लेखपाल मनोजजी चांडक ह्यांनी केले व त्यांना मेलोडीज ऑफ अकोला च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: