दर्यापूर जि. अमरावती याचेवर खूनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, चोरी करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, फौजदारीपात्र कट रचणे, गैरनिरोध, शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे,
धमकी देणे, बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे, तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे अशा प्रकाराचे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई तसेच कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनीमय अन्वये हद्वार कारवाई करण्यात आली होती, परंतु त्याचेवर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. त्याचेवर हद्दपार कार्यवाही करून सुद्धा तो हद्द्वार आदेशाचे उल्लंघन करून वारंवार गुन्हे करीत होता.
त्याची दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड धनराज पुंडलिक खत्री वय-३२ वर्षे रा. बनोसा ता. दर्यापूर जि. अमरावती याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ सा, अमरावती ग्रामीण यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांना सादर केला होता.
मा. जिल्हादंडाधिकारी पवनीत कौर मॅडम यांनी सर्वकायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतः चे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षाकरीता अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २० / १२ / २०२२ रोजी पारीत केला.
मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अमरावती यांचे आदेशावरून धनराज पुंडलिक खत्री वय – ३२ वर्षे रा. बनोसा ता. दर्यापूर जि. अमरावती यास दिनांक २०/१२ /२०२२ रोजी जिल्हा कारागृहात सदरचे आदेश जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे तामील करण्यात आले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अविनाश बारगळ सा अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव सा, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक तपन कोल्हे सा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोहेकॉ अमोल देशमुख यांनी तसेच पो.स्टे. दर्यापूर येथील सहायक पोलीस निरीक्षक विनायक लंबे यांनी परिश्रम घेतले.
अमरावती ग्रामीण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. ” असा इशारा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिला आहे.