बडनेरा विधानसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीबाबत घडून आली सकारात्मक चर्चा…
अमरावती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम आज मुंबई येथिल निवासस्थान नेपीयर सी येथे सकारात्मक चर्चा घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान बडनेरा विधानसभा मतदार संघातिल विविध विषयावर विस्तृत चर्चा घडून आली.
त्याचप्रमाणे जयंत पाटील यांनी पूर्ण पाठिंबा असल्याचे कळविले.बडनेरा विधानसभा मतदार संघातील शासकीय मोदी हॉस्पिटलची दैनिय अवस्था,आरोग्यव्यवस्था,महिला सक्षमिकरण, रस्ते,पानी,रखडलेली विकासकामे,निष्फळ् ठरलेले औद्योगिक धोरण,निकामी शिक्षणव्यवस्था, आधुनिकीकरण अभावी शेतीव्यवसाय,भातकुली येथे स्वतंत्र बाजारपेठ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,रखडलेले विमानतळ, औद्योगिक वसाहत,व इतर विषयावर विस्तृत मांडणी नितीन कदम यांनी जयंत पाटील यांच्यासमोर सादर केली.
बडनेरा क्षेत्र ही शेतकरीबहुल भाग असून येथे शेतकऱ्याची दैनिय अवस्था व संपूर्ण व्यथा जयंत पाटील यांच्या समोर नितीन कदम यांनी आपल्या दस्ताऐवजात सादर केली. मागील १५ वर्षापासून राजकीय सूडबुद्धी व उदासीनतेमुळे येथील भाग विकासात्मक स्वरूपात किती मागासलेला आहे याचीसुद्धा प्रचिती देण्यात आली.बडनेरा विधानसभा मतदासंघातील हजारो स्थानिकांना व भूमिपुत्रांना रोजगानिर्मिती करिता व्यागन फॅक्टरी येथे प्राधान्य देण्यात यावे यासंदर्भातील माहिती देण्यात आली.तरुणाई रोजगाराअभावी दुसऱ्या शहरात जाऊन तिथे वास्तव्यात राहून उदरनिर्वाह करतात याची माहिती कदम यांनी दिली.
दरम्यान या चर्चासत्रात कोळी महादेव जमातीच्या विविध चार प्रमुख वैध मांगण्या व जात वैधता प्रमाणपत्र समस्येविषयी विधानसभेत व शासनस्तरावर प्रश्न मांडावा या आशयाचे निवेदनही देण्यात आले.यावेळी नितीन कदम यांच्यासमवेत महादेव कोळी समाजाचे संजय चुनकिकर उपस्थित होते. सदर भेटीदरम्यान जयंत पाटील यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर करत शुभेच्छा दिल्या.