सांगली – ज्योती मोरे.
सांगली शहरात गेली 1 मे 2018 महाराष्ट्र दिनापासून अखंडितपणे सलग ५ वर्षे स्वच्छता अभियान राबवणाऱ्या युवा स्वच्छतादूत निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व संपूर्ण टीमचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून शुभेच्छापत्र व पुष्पगुच्छ देत सन्मान केला… तसेच मा.पालकमंत्री जयंत पाटील यांनी देखील शुभेच्छा पत्राद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले की, निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व टीमने गेली ५ वर्षे सांगली शहरात व राज्यात विविध ठिकाणी अविरतपणे स्वच्छता अभियान राबवित आहेत त्यांचा हा उपक्रम स्तुत्य व समाजाला स्वच्छतेची प्रेरणा देणारा आहे,निर्धारची कामगिरी ही उल्लेखनीय असून ही माझ्याकडून सर्व स्वच्छतादूतांना शुभेच्छा..
मा.पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुभेच्छा द्वारे व्यक्त केलेल्या शुभेच्छा… कृतीतून व्यक्त होवून सिद्ध होणं निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व टीमने करून दाखवले आहे… 1825 दिवस म्हणजेच 5 वर्षे अविरत शारीरिक कष्ट व ते ही शहरातील अनेक घाणीच्या ठिकाणी पाय रोवून उभे रहाणे सर्वानाच जमत नाही. राकेश व त्यांचे सहकारी रोजची सकाळ ही सांगलीकर जनतेच्या हितासाठी देत आहेत.
राकेश तूझ्या सारख्या खऱ्या देशभक्ताला काहीच अशक्य नाही. असंच सातत्याने काम करत रहा.. हिच खरी राष्ट्र भक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा… या स्वच्छता दूतांच्या अभिनव उपक्रमास शुभेच्छा! राकेश दड्डणावर म्हणाले की.. गेली वर्षातील अनुभव व पाठबळाच्या जोरावर यंदाच्या 1 मे पासून एकाच वेळी 5 जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्याचा आमचा मानस आहे…
सांगली,सातारा,कोल्हापूर,लातूर,छत्रपती संभाजी नगर आदी ५ शहरात देखील १ मे पासून स्थानिक युवकांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सुरू होईल.. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात स्वच्छतेचा प्रचार प्रसार करण्याचा आमचा निर्धार आहे यासाठी समाजातील सर्व स्तरातून पाठबळ मिळत आहे..यावेळी अनिल अंकलखोपे, भरतकुमार पाटील,वसंत भोसले, अनिरुद्ध कुंभार,सचिन ठाणेकर,शकील मुल्ला,मनोज नाटेकर,गणेश चलवादे आदिंसह स्वच्छतादूत उपस्थित होते.