Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingNeha Thomre | परिणीती चोप्राच्या लग्नात वऱ्हाडी पाहुणे...नेहा ठोंबरेचं धमाल रील...

Neha Thomre | परिणीती चोप्राच्या लग्नात वऱ्हाडी पाहुणे…नेहा ठोंबरेचं धमाल रील…

Neha Thomre : विदर्भाच्या बोलीभाषेत सर्वाना खळखळून हसायला लावणारी नागपूरची नेहा ठोंबरे हिची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे तीने म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा लग्नाचे वर्णन मस्त वऱ्हाडी भाषेत केलय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या ‘द लीला पॅलेस’मध्ये थाटामाटात आणि शाही पद्धतीने पार पडली. त्यांच्या लग्नाचे Video फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.

या लग्नात त्याने आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही आमंत्रित केले होते. या समारंभात राजकीय पार्श्वभूमीतील काही व्यक्तींनीही सहभाग घेतला होता. त्यांच्या लग्नाच्या अनेक सुंदर झलक आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती.

सोबतच परिणीतीच्या लग्नात मोठी बहीण प्रियंका व जावई निक सहभागी न झाल्याने नेटकऱ्यांनी हजार शंका उपस्थित केल्या होत्या. तीच शंका पण खास वऱ्हाडी शैलीत उपस्थित करणाऱ्या नेहा ठोंबरे यांचा रिल भन्नाट व्हायरल होतोय.

‘वऱ्हाडी रिलेटिव्ह इन परिणीती चोप्राज वेडिंग’ Varhadi relatives in Parineeti Chopra wedding या टॅगलाइनने सोशल मीडियावर अपलोड झालेला तो व्हिडीओ चांगलाच भाव खाऊन जात आहे. वऱ्हाडी बाण्याच्या नेहा ठोंबरे या जणू परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नात सहभागी झाल्यात, अशा हसऱ्या आविर्भावात त्यांनी तो एकपात्री रिल बनविला आहे.

कावं काकू, प्रियंका नाही आली का लग्नाले? असे विचारत बाप्पा, बहिणीच्या लग्नाला यायले पाहिजे होतं तिनं, एवढं जवळचं लग्न होतं, शोभलं काय तिले? मी तर माया आतेभावाच्या पोराच्या पोराचं लग्न होतं तं नागपुरातून वाठोड्याला गेलती. तसं मले काही नाही, पण मले प्रियंकाचा मालक पाहायचा होता, अशी ती पुटपुटते.

आपण आंदण म्हणून पाच तोंडी गॅस घेतल्याचेही नेहा सांगते. पोरीची टिकली पडली, बाबू इकडे अक्षदा आण, आंदण काय घेतलं, पाकिटात पैसे टाकजा, अशा पंचायती करणारा तो व्हिडीओ सोशल मीडियात भन्नाट व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ ३० सप्टेंबर रोजी @neha_thombre या इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले – परिणीती चोप्राच्या लग्नात वऱ्हाडी नातेवाईक (Varhadi relatives in Parineeti Chopra wedding).

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: