Thursday, June 20, 2024
spot_img
Homeराज्यछत्तीसगड सीमेवर नक्षलवादी आणि पोलीस चकमक…दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी पाठवले यमसदनी…

छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी आणि पोलीस चकमक…दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी पाठवले यमसदनी…

गडचिरोली – मिलिंद खोंड

छत्तीसगड सीमेवरील गोडलवाही पोलीस स्टेशन पासून १० किमी अंतरावर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी तळ ठोकून असल्याची गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार गडचिरोली पोलीस दलाकडून तातडीनेशोधमोहीम राबवली या दरम्यान माओवाद्यांनी अभियान पथकावर अंदाधुंद गोळीबार केला असता पोलीस दलाने प्रत्युत्तर देत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले.

ही चकमक जवळपास एक तास सुरू होती. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता एक एके ४७ आणि एक एस एल आर रायफल सह दोन पुरुष माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यापैकी एकाची ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

मृतक नक्षली वट्टी हा २०१९ मधील जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. ज्यात गडचिरोली पोलिसांचे १५ जवान शहीद झाले होते. पुढील ऑपरेशन आणि परिसराचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह गडचिरोली येथे आणले असुन दुसऱ्या मृतकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: