Saturday, December 21, 2024
Homeराज्यकुपवाड मधील वृद्ध सेवा आश्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नेत्र तपासणी शिबिर...

कुपवाड मधील वृद्ध सेवा आश्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नेत्र तपासणी शिबिर संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट सध्या अनेक सामाजिक कामांमध्ये सक्रिय होत असून, एक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

आज सांगलीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या वतीने शहर जिल्हा सरचिटणीस सोहेल इनामदार यांच्या नेतृत्वाखाली व शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड मधील वृद्ध सेवा आश्रमात नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमील बागवान दलित महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश मोहिते सहा इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यापुढील काळातही अशा तऱ्हेने अनेक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेंसह, सोहेल इनामदार यांनी व्यक्त केली आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: