Thursday, December 5, 2024
Homeमनोरंजनकालिदासाच्या भूमीत होणार महासंस्कृती महोत्सव... दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक स्पर्धांचे आयोजन...

कालिदासाच्या भूमीत होणार महासंस्कृती महोत्सव… दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक स्पर्धांचे आयोजन…

रामटेक – राजू कापसे

शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासाची भूमी म्हणजेच रामटेक येथून 19 जानेवारीला सुरुवात होणार असून 23 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक प्रकारच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहेत. सायंकाळी मुख्य कार्यक्रम 7 वाजता सुरु होईल. तर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कवि कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महा खिचडीचे प्रात्यक्षिक,लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा ,फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा , एयरोमॉडलिंग शो, फुड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना बघावयास मिळणार आहे.

राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात हेमा मालिनी, कैलास खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. 19 जानेवारीला पद्मश्री हेमा मालिनी यांची रामायण नृत्य नाटिका, 20 जानेवारीला सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडकर यांचे गीतगायन, 21 जानेवारीला विख्यात गायक, हंसराज रघुवंशी यांचा भक्तीगीत कार्यक्रम, 22 जानेवारीला रामटेकवरील सिंधुरागीरी महानाट्य, 23 जानेवारीला विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची स्वरसंध्या असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर व रामटेकच्या SDO वंदना सवरंगपते यांनी केले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: