Monday, December 23, 2024
Homeराज्य'नमो सन्मान' ची पीएम किसान समित्याच करणार अंमलबजावणी वर्षभरात तीन टप्प्यांत मिळणार...

‘नमो सन्मान’ ची पीएम किसान समित्याच करणार अंमलबजावणी वर्षभरात तीन टप्प्यांत मिळणार प्रत्येकी दोन हजार रुपयांचे अनुदान…

अकोला – अमोल साबळे

केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर समित्याच करणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पीएम किसानसाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारीच काम पाहणार आहेत.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अशा राहणार समित्या

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ग्रामस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समित्यांमार्फत सदर योजनेचे संनियंत्रण करण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेसाठी नेमलेले नोडल अधिकारीच या योजनेचे काम पाहणार आहे. योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांकडे देण्यात आली आहे.

अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी बळिराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची घोषणा आहे. केली होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी कशी करावी, यासाठी शासन आदेश जारी करण्यात आला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग हे संयुक्तपणे पोर्टल विकसित करणार आहेत. तसेच केंद्र शासनाच्या संमतीने पीएम किसान व नमो शेतकरी निधी योजनांच्या पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

आणि तिसरा डिसेंबर ते मार्चदरम्यान प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे. अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतल्यास अशा लाभार्थ्याकडून महसूल यंत्रणेच्या या योजनेंतर्गत पहिला हप्ता हा माध्यमातून वसूल करण्यात येणार या योजनेस ३० मे २०१३ रोजी एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: