Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांची मूर्तीजापुर नगरीत आढावा बैठक संपन्न...

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांची मूर्तीजापुर नगरीत आढावा बैठक संपन्न…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढावा बैठक चे आयोजन काही दिवसापासून सुरु आहे.त्या प्रित्यर्थ मुर्तीजापुर टाकवाडी येथेल बालू भाऊ टाक यांच्या घरी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी समता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटक मा.श्री.रवी भाऊ सोनवणे प्रदेश प्रसारक मा. श्री.डॉ नागेश गवळी व मा.श्री.प्रा. संतोष विरकर विभागीय अध्यक्ष मा.श्री.अरविंद गाभाने विभागीय संघटक मा.श्री.गजानन इंगळे सर अकोला जिल्हाध्यक्ष मा.श्री. सदाशिवराव शेळके सर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे हे उपस्थित होते.

या आढावा बैठक मध्ये ओबीसी समाजाने एकत्र यावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आणि ही संघटना फक्त माळी समाजाची नसून संपूर्ण बहुजन समाजाची आहे याबद्दल प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर नागेश गवळी यांनी आपल्या वाणीतून केले. मुर्तीजापुर शहराध्यक्ष बालू भाऊ टाक व तालुका अध्यक्ष आशिष नीलकंठ यांनी केले होते.

यावेळी गेल्या एक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी सभासदांची स्वागत व परिचय देण्यात आला. तालुका अध्यक्ष आशिष निलखन यांना संपूर्ण जिल्ह्यातील सर्वात सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचालन निलेश मेहरे सर यांनी केले तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष आशिष निलखन यांनी केले.

आभार प्रदर्शनाची जबाबदारी ढवळे सर यांना सोपवण्यात आली होती. गेल्या एक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे परिचय व स्वागत करण्यात आले नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे…… बालू भाऊ टाक शहराध्यक्ष
आशिष नीलकंठ तालुकाध्यक्ष, जगदीश मारुडकर कार्याध्यक्ष, अविनाश गणोरकर,राजेश ढवळे, प्रवीण इंगळे, श्रीकांत इंगळे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले होते.

निलेश मेहेरे सरचिटणीस प्रशांत सारसकर सचिव मधुकर नीलकंठ सहसचिव अशोक भाऊ वाघमारे संघटक जगदीश तायडे सहसंघटक विनोद मानकर,अक्षय राऊत,अतुल वाठ,अमोल गढवे, गजानन उमाळे,अक्षय काळे, शरद नंदे,मोहन भाऊ आंबेकर, शरद तायडे,अमोल निलखन, जगदीश राऊत,चेतन धर्माळे, मंगेश बेलसरे,जगदीश धर्माळे, दिनेश उमाळे सदस्य पदी निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष,महाव्हाईस न्यूज तालुकाध्यक्ष मूर्तिजापुर फोटोग्राफर मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष नरेंद्र खवले यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: