Saturday, December 21, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्ष पदी नामदेव राठोड...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्ष पदी नामदेव राठोड…

राजु कापसे प्रतिनिधी

रामटेक: वीर हनुमान मंदिर आनंद नगर रामटेक येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष श्री राजकुमारजी वैद्य यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत रामटेक तालुका कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले यात सर्वानुमते हरहुन्नरी व्यक्तीमत्व श्री नामदेव राठोड सर यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर सरचिटणीस पदी संदीप वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली.

अजय चव्हाण (कार्याध्यक्ष), परसगाये (सहसचिव) शंकर कनाके (कोषाध्यक्ष), गोदावरे, जाम्भूळे,धम्मानद बागडे, योगेश वरठी (उपाध्यक्ष), निलेश नन्नावरे (प्रसिद्धी प्रमुख) सौ चारुलता टेकाडे (महिला प्रमुख)
याप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या.सभेचे प्रास्ताविक शिक्षक नेते श्री नरेंद्र डबीर यांनी केले तर आभार श्री मनोहर वांढरे यांनी मानले सभेला बालचंद नाटकर,अशोक झगडमवार,भास्करचव्हाण मनोहर सोनटक्के, संतोष राठोड ,पुरुषोत्तम हटवार, दिलीप धोमने, भोपे आदी उपस्थित होते

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: