Monday, December 23, 2024
Homeराज्यनालासोपारा | भंडारी समाज संस्था यांचा ५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात...

नालासोपारा | भंडारी समाज संस्था यांचा ५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला…

मुंबई – गणेश तळेकर

भंडारी समाज संस्था, वसई तालुका यांचा 5 वा वर्धापन दिन नुकताच नालासोपारा येथील सारस्वत सभागृहात दणक्यात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नवीनचंद्र बांदिवडेकर हे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते.

त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. महासंघाच्या वतीने विश्वस्त श्रीमती रीटा मिठबावकर, खजिनदार श्री जगदीश आडविरकर, सचिव श्री प्रवीण आचरेकर, सौ शलाका पांजरी, श्री शरद पांजरी व गणेश साखरकर उपस्थित होते.

स्थानिक कलावतानी नृत्य, गायन व मालवणी नाटिका सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. अध्यक्ष श्री संतोष टेंबवलकर, कार्याध्यक्ष श्री जयवंत रूमडे व सचिव श्री विश्राम सोन्सुरकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: