Saturday, July 27, 2024
spot_img
Homeराज्यनागपूर जिल्हा परिषदेत महामानवास अभिवादन…

नागपूर जिल्हा परिषदेत महामानवास अभिवादन…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून महामानवास आदरांजली वाहिली.यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे निरंजन पाटील, नरेंद्र धनविजय, धनराज मेश्राम, प्रशांत मोंढे, सचिन रामटेके, नरेंद्र मेश्राम, संजय मलके, भास्कर डोनेकर आदी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. सोहन चवरे यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: