गौरव गवई : विदर्भात प्रतिभावान मुलांची कमी नाही पण विदर्भ नाव पुढ आले कि त्यांना पाहिजे तशी प्रसिद्धी मिळत नाही. पण मूर्तिजापूरच्या या पोरांनी तलापती विजयचा (Thalapathy Vijay) लिओ (Leo) या चित्रपटाच्या ट्रेलरचा सीन रिक्रिएट केल्याने दाखवून दिले की ‘हम किसीसे कम नही’… सध्या लिओ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे कलेक्शन कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे ही वेगळी बाब आहे. पण चाहत्यांमध्ये जशी उत्कंठा आहे, तीच तलापती विजयच्या इतर चित्रपटांसाठी आहे.
तळपती विजयच्या चित्रपट रिलीज आल्यापासून ही उत्सुकता वाढत आहे. तेव्हापासून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा चाहत्यांमध्ये निर्माण होऊ लागली. अशाच तलापती विजयच्या चाहत्याने लिओ या चित्रपटाबद्दलची आपली क्रेझ खास पद्धतीने व्यक्त केली आहे. चाहत्यांनी आपल्या सुपरस्टारचे यश वेगळ्या पद्धतीने साजरे केले.
तलापती विजयच्या (Thalapathy Vijay) या चाहत्याने लिओ चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा तयार केला आहे. या चाहत्याने शोमैन स्टूडियो (showman studio) नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्याला फिल ऑफ लिओ (Feel of Leo) ट्रेलर रिक्रिएशन असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेलरची लांबी २.४० सेकंद आहे. २.४० सेकंदांच्या मनोरंजनातील काही दृश्ये मूळ ट्रेलरमधून देखील घेण्यात आली आहेत. याशिवाय चाहत्यांनी त्यांचा आवडता सुपरस्टार तळपती विजय यांची त्यांच्या खास शैलीत नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सर्वच चाहत्यांना हा प्रयोग आवडला आहे.
या लिओ चित्रपटाचा ट्रेलर recreation (Leo Trailer recreation) चे दिग्दर्शन ओम खरबडकर ने केले आहे. सोबत कलाकार म्हुणुन चैतन्य, गौरव सरदार, आणि सूफी नयन सोबत शोमैन स्टूडियो (showman studio) चे बाकीच्या कलाकार पण आहेत.
लिओने बॉक्स ऑफिसवर खूप वेगाने कमाई केली आहे. तलापती विजयच्या चित्रपटांकडून हेच अपेक्षा आहे आणि तसंच झालं. तलापती विजय आणि लोकेश कंगराजन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या चित्रपटाचा रसिकांनी मोठ्या प्रमाणात आवडलेला आहे.
चाहत्यांच्या या प्रेमामुळे चित्रपटाने सहा दिवसांत 250 कोटींची कमाई केली आणि जगभरातील कमाईचा आकडा 400 कोटी रुपये पार केले आहे. चित्रपटात तलापती विजय व्यतिरिक्त त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.