Saturday, July 27, 2024
spot_img
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर विधानसभेच भाजपच्या तिकिटाचे गणित लोकसभेच्या निकालावर…सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याची लागणार वर्णी?…

मूर्तिजापूर विधानसभेच भाजपच्या तिकिटाचे गणित लोकसभेच्या निकालावर…सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याची लागणार वर्णी?…

मूर्तिजापूर :लोकसभेचा निकाल येत्या ४ जूनला लागणार आहे, त्यापूर्वीच विविध पक्षातील कार्यकर्ते आपला उमेदवार एवढ्या मतांनी विजयी होणार असा भाबडा अंदाज लावत आहे. मात्र मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातून भाजपला पाहिजे तेवढं प्रतिसाद मिळणार नसल्याचा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे, सोबतच प्रचारासाठी काही भाऊ सोबतचे दलिंदर कार्यकर्ते जे मूर्तिजापूर शहरात काय अवघ्या मतदार संघात बदनाम आहेत अश्या कार्यकर्त्यांना पाहून अनेकांनी आपला मतांचा विचार बदलला असल्याचे समजते.

अकोला लोकसभा मतदार संघ हा विकासापासून कोसोदुर आहे, मतदार संघातील मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघ तर विचारूच नका, या विधानसभेचा आमदार हा स्थानिक असून सुध्दा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या १५ वर्षात सोडवता आला नाही, नागरिक सोशल मिडीयावर नळ कधी येणार अश्या विनवणी करतात मात्र प्रतिनिधी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळतात. तर यावेळेस मतदार संघातील नागरिक निवडणुकीच्या वेळेस भाऊला टाळतील का? या १५ वर्षात भाऊने अफाट माया जमा करून शेतजमिनी घेण्याचा सपाटा सुरू केला असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करताहेत. मात्र यावेळी पक्ष दुसरा चांगला गरीब कार्यकर्ता देणार असल्याचे समजते. पक्ष आता वेळेवर कोणाला बाशिंग बांधणार सध्यातरी सांगता येणार नाही. मागील निवडणुकीत फार कमी फरकाने भाजपचे उमेदवार निवडून आले होते तर यावेळेस शिवसेना सुद्धा सोबत नसणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील तीन मतदार संघात भाजपची जागा धोक्यात आहे. जर मूर्तिजापूर विधानसभेच्या जागेत बदल केला तरच येथील जागा कायम राहू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

परंतु लोकसभेच्या निकालावर बरेच काही अवलंबून असणार आहे. तर काही भाऊ सोबतचे भावी आमदार भाऊचा पत्ता कट आणि आपला नं लागला पाहिजे यासाठी अनुपभाऊच्या पुढे पुढे करतांना दिसले, मात्र असेही कार्यकर्ते होते जे काही दिखावा न करता अनुपभाऊचा गावोगावी प्रचार करीत होते. यांची चार पाच लोकांनी टीम होती जी भाऊचा एक रुपया न घेता आप आपल्या कार्यक्षेत्रात अनुप भाऊचा इमान इतबारे प्रचार करीत होती. जर अनुपभाऊ निवडून आले तर या गरीब कार्यकर्त्यांचा नक्कीच विचार होणार का?. असा प्रश्न सामान्यांच्या मनात सुरु आहे. तर या मतदार संघात इच्छुकांची बरीच गर्दी आहे पण दोन तीन जे खास आहेत जे पक्षाशी एकनिष्ठ असून मानपानाचा विचार न करता आपली जबाबदारी समजून पक्षाचे काम करतात.

या लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघाला भाजपचा एक चांगला उमेदवार, कार्यकर्ता मिळणार आहे, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पर्याय असू शकतो मात्र हे सर्व लोकसभेच्या निकालावर अवलंबून असणार आहे…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: