Saturday, July 27, 2024
spot_img
HomeBreaking Newsमूर्तिजापूर तालुक्यात अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…!

मूर्तिजापूर तालुक्यात अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…!

नरेंद्र खवले,मूर्तिजापूर

मूर्तिजापूर: तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीस पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी ६ ते ६. ३० च्या सुमारास खापरवाडा व टीपटाळा इथे घडली आहे.
मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात मंगळवार दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यात पाऊस झाला. यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे २७ व टीपटाळा येथील शालिग्राम शिवराम डोंगरे ६५ वर्ष हे आपल्या शेतात काम करत असतांना अचानक त्यांच्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.

दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून पडली तर झाडांचे पडझड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली तर पुढील उत्तरणीय तपासणी करिता मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: