मूर्तिजापूर : बरेच दिवसापासून रावणाचा चौथा भाग कधी येतो अशी अनेकांची विचारणा होती. हा रावण कोण आहे? या बाबत तर अनेक फोन आलेत. मात्र रावणाच्या या सिरीजचा फायदा काही संधी साधू राजकारणांनी घेतला होता. त्यामुळे सिरीज काही कारणास्तव थांबावावी लागली. खरं तर ही सिरीज एखाद्याच्या वाईट कृत्याविषयी उचलेले पाऊल आहे. तुमचं मनोरंजन व्हावं या दृष्टीने ही सिरीज नाहीच आहे. तर एका गंभीर प्रकरणांमध्ये तुम्ही कसे शांत राहू शकता? हि तुम्हाला विचारणा आहे, तुम्हाला फक्त माहिती देणे या सिरीजचा एक भाग आहे. आपण दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेली रावणाची सिरीज याची बरेच भाग असू शकतात. जशी जशी माहिती आमच्यापर्यंत येईल तशी तशी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या सिरीज मध्ये कोणाच्याही नावाची उल्लेख नसून ज्याच्याकडे अनेक लोक बोट दाखवत असतील तर त्यांनी या प्रकरणात पोलिसांना धारेवर धरून याची कठोर चौकशीचे आदेश द्यावे जेणे करून तुम्हाला खरा गुन्हेगार माहिती पडेल. नाहीतर आम्हाला न्यायालयाची नोटीस देऊन विचारणा करावी मग आम्ही ते न्यायालयात काय सादर करायचे ते करू तरच या सिरीजचा तेव्हाच अंत होणार जेव्हा खरा गुन्हेगार कारागृहात जाईल.
अशा घटना आपल्या शहरात घडू शकतात का? याबाबत मात्र याहीपेक्षा खतरनाक घटना घडू शकतात हे येणाऱ्या सिरीज मध्ये तुम्हाला माहित पडणार आहे. हा एका व्यक्ती विषयी असलेला द्वेष नसून सत्याला वाचा फोडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. शहरात एका तरुणीचा जीव जातो आणि त्यावर तुम्ही लोक कसे शांत राहतात. याविषयी लोकांना जागृत करण्यासाठी ही सिरीज सुरु केली आहे. विशेष म्हणजे या रावणाच्या आहारी गेलेल्या स्त्रियांना त्याच्या जाचातून बाहेर काढण्याचा उद्देश आहे. अशा सिरीजमुळे मला अडकविण्याचा अनेक जण योजना आखात आहे. किंवा मला मारण्याच्या काही चिर्कुट योजना आखत असल्याचे समजते. मात्र या गावाचे अनेक उपकार माझ्यासारख्या लहानशा पत्रकार असल्यामुळे ते ऋण फेडण्याची हीच माझ्याकडे संधी आहे. या संधीचं सोनं नक्कीच आपण करूया आणि त्या रावणाच्या तावडीतून असलेल्या अबला स्त्रिया बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया.
रावण म्हणजे वाईट विचार करणारा असा या ठिकाणी होतो. मात्र मूळ रावणाचे त्याची तुलना होऊ शकत नाही हेही तेवढं सत्य आहे. तर अनेकांनी याला रेवण्णा म्हणून संबोधलं आहे. तर हा जो कोणीही असो आपल्याला त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपणही सिरीज सुरू केली आहे. तर या सिरीज मध्ये जो संशयित आरोपी आहे त्या आरोपी बाबत माहिती पुढील भागात देऊन त्याचं स्टेटमेंट मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याच स्टेटमेंट आल्यानंतर मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि खरा आरोपी कोण आहे हे संपूर्ण शहराला माहिती पडणार.
आज भाऊबीज आहे, या भाऊबीजच्या दिवशी जी मुलगी मृत्यू झाली त्या मुलीची आठवण तिच्या भावाला आली नसेल का?. ती मुलगी एकट्याच भावाची बहिण असू शकते काय?. आता तर राज्यात लाडके भाऊच भाऊ झाले ज्या भावाकडे गृहखाते आहे. तो लाडका भाऊ या प्रकरणाची चौकशी करेल का?. त्या बहिणीला न्याय मिळवून देईल का?. तोपर्यंत वाचत रहा….