मूर्तिजापूर : महाव्हाईस न्यूजने काल-परवा पोस्ट केलेल्या बातमीने शहरात खळबळ उडवून दिली. या बातमीचा हेतू शहरात खळबळ उडून देणे नव्हता तर शहरातील एका नेत्याने समाजसेवेचा पांघरलेला बुरखा फाडायचा होता. या बातमीसाठी शहरातील अनेक लोकांचे फोन आलेत. यामध्ये काही संधी साधू नेत्यांचेही फोन होते या प्रकरणासाठी ठाणेदारांना निवेदन किंवा मोर्चा काढण्यासाठी ही तयारी दर्शवली मात्र या प्रकरणाचे राजकारण करू नये, अशी ताकीद त्यांना दिली. अनेकांनी लावलेला अंदाज ही खरा ठरला तर या बातमीचा हेतू एवढाच की एका विशिष्ट पक्षासाठी ज्या महिला काम करत आहेत त्या सुरक्षित नाहीत एवढाच फक्त. त्या कशा सुरक्षित नाहीत त्याबद्दलच आपण ही शृंखला सुरू केली आहे. या सिरीज मध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. अनेकांच्या मते या खूनाशी त्या नेत्याचा संबंध कसा?. एवढेच काय तर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला तर हा नेताच या खूनाचा मुख्य आरोपी असू शकते. अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. अनेक जवळच्या कार्यकर्त्यांनी त्याचं राक्षसी रूप बघितले आहे. तर हा रात्री १२ नंतर झिंगाट झाल्यावर त्याला असले आंबट शौक सुचतात यासाठी तो बाहेरगावाहून महिला बोलावून त्याची मौज पूर्ण करतो एवढेच काय तर बाहेरगाव चा जुगाड जमला नाही तर रेल्वे स्टेशन वरील भरकटलेले महिला याला चालतात. एवढी धक्कादायक माहिती खास सूत्रांनी दिली आहे. जर नाहीच मिळाले तर चिडचिड होऊन कोणालाही फोन लावून कोणाच्याही आई बहिणीवर शिव्या देतो. तर या नेत्याचा एका महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणातही हात असल्याचे समजते तर दोन्ही प्रकरणात या नेत्याचा थेट संबंध असल्याचे पुरावे लवकरच आपल्यापर्यंत येतीलच.
शहरात व्यवसाय निमित्त आलेल्या मुलीचा निर्घुण खून होणे हे आपल्या शहरासाठी बदनामीकारक घटना असून या घटनेने शहराचे नाव, प्रतिमा खराब झाली आहे. तर गेल्या तीन महिन्यापासून या तरुणीचा मारेकरी पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या तरुणीला एका नेत्याने मारल्याचा अंदाज काही लोक लावत होते. त्याचे कारणही तसेच आहे. ज्या दिवशी या मुलीची हत्या झाली तेव्हा या नेत्याची हालचाली संशयास्पद होत्या नेत्यानेच प्रकरण दाबले असल्याचाही अंदाज काही लोकं लावत आहे तर हा नेता कोण?.या मुलीचे मारेकरी सध्या शहरात खुल्याआम फिरत आहेत. मात्र या खुनाचा आरोप ज्या वेटरवर लावण्यात आला तो कुठे गायब झाला?. त्याचाही गेम झाला कि काय? असाही प्रश्न जनता दबक्या आवाजात करीत आहे. तर त्या वेटरला नेपाळमध्ये पळवून लावले तर नसेल ना? असली शंका काही लोकांना येत आहे.
या खुनाशी संबंध असलेल्या प्रत्येक जणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली पाहिजे मग तो कोणताही नेता असो कि मोठा ठेकेदार. सर्वांची विचारपूस झालीच पाहिजे तर ज्या ठिकाणी बाजीरावचा वापर करायचा तो बिन्दास्त पोलिसांनी करावा तरच या खुनाच्या पाठीमागे कोण आहे ते समस्त मुर्तीजापुरवासियांना कळणार. ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी अकोल्यावरून पोलिसांचा फौज फाटा पाहून लोकांना वाटले दोन तीन दिवसात खुनाचा उलगडा होणार, मात्र तीन महिने उलटून गेले तरी या खुनाचा उलगडा झाला नाही. अश्या संथ गतीच्या तपासामुळेच नागरिकांना संशय वाढला आणि चर्चा सुरु झाल्यात. या नेत्याचं या खुनामागे नाव घेण्याचे कारण फक्त त्याचा स्त्रीलंपटपणा सर्व शहरवासीयांना माहित पडला असून लोक या नेत्यावारच बोट दाखवीत असल्याचे समजते… पोलिसांनी जर निष्पक्ष तपास केला तर या खुनाचा मुख्य आरोपी कोण आहे ते कळेलच मात्र या प्रकरणात मोठ्या नेत्याचा दबाव असल्यामुळे हे प्रकरण पुढे सरकत नाही आणि याचा निकाल लवकर येणार नाही तोपर्यंत सहन करत रहा….क्रमशः