Friday, November 8, 2024
Homeराज्यदेगलूर बिलोली विधानसभेसाठी बौद्धांना उमेदवारी द्यावी अन्यथा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत...

देगलूर बिलोली विधानसभेसाठी बौद्धांना उमेदवारी द्यावी अन्यथा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत पक्षाला किंमत चुकवावी लागेल…

भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे.

बिलोली – रत्नाकर जाधव

आगामी विधानसभा निवडणुकीत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बौद्धांना उमेदवारी द्यावी अन्यथा विधानसभा व लोकसभा पोट निवडणुकीत पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शत्रूघन वाघमारे यांनी काँग्रेस पक्ष संघटनेला दिला आहे.

आगामी काळात राज्याच्या निवडणुकांची रेलचेल चालू झाली असून त्या त्या विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढत आहेत.त्याच अनुषंगाने देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात ही सर्वच प्रमुख पक्षाच्या इच्छुकांनी मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत असतांना पक्षश्रेष्ठींची मनधरणी ही केली जात आहे.देगलूर बिलोली मतदारसंघ हा २००९ साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असून २००९ ते आजतागायत या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने रावसाहेब अंतापुरकर पितापुत्रांनाच संधी दिली.

२००९ पासुन बौद्ध समाजातील इच्छुकांनी सातत्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली.परंतु पक्षाकडून सत्याने बौद्धांवर उमेदवारीसाठी अन्यायच केला.२००९ पासून सातत्याने मातंग समाजाच्या उमेदवारांना काँग्रेसने संधी दिली त्या उमेदवारांना बौद्ध समाजातील मतदारांनी नेहमीच सहकार्य केले.

यावेळी मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या वतीने बौद्धांनाच उमेदवारी द्यावी अशी एकमुखी भूमिका घेतली आहे. जरी या मतदारसंघात आजघडीला बौद्ध समाजातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली तरी उमेदवारी फक्त एकालाच मिळणार आहे हे त्रिवाद सत्य आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षांच्या श्रेष्टींनी यावेळी बौद्ध उमेदवार दिला तर अधिक चांगले होईल व काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघात बौद्धांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.

मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून देगलूर बिलोली मतदारसंघात काँग्रेसने दोनवेळा मातंग समाजातील अंतापुरकर पितापुत्रांनाच संधी दिली व त्यावेळी बौद्ध समाजतील कार्यकर्त्यांनी व मतदारांनी भाजपाच्या विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मत दिली.

त्यामुळे यावेळी काँग्रेस पक्षाने बौद्धांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांनी केली असून त्यातही मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्याचा विचार करण्याची विनंती केली आहे.

त्याच बरोबर यावेळी जर काँग्रेस पक्षाने देगलूर बिलोली मतदारसंघात बौद्ध उमेदवार मग तो कोणीही का असेना त्याला उमेदवारी नाही दिली तर आगामी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागेल असा सज्जड इशारा शत्रुघ्न वाघमारे यांनी दिला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: